'शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या भाजपला मतदान करू नका'; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या
10 April 09:25

'शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या भाजपला मतदान करू नका'; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या


'शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या भाजपला मतदान करू नका'; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

कृषिकिंग, डेहरादून: उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीये. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी 'भाजपाला मतदान करू नका,' असं या शेतकऱ्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ईश्वरचंद्र शर्मा असं या ६५ वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून, मंगळवारी पहाटे विष पिऊन त्यांनी आपले जीवन संपवले.

'भाजपा सरकारने गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांना उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे भाजपाला मतदान करू नका, अन्यथा ते प्रत्येकाला चहा विकायला लावतील,' असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. दरम्यान पोलिसांकडून या सुसाईड नोटची पुष्टी करून घेतली जात आहे.

ईश्वरचंद्र शर्मा यांना शेतीसाठी कर्ज हवे होते. त्यासाठी एका मध्यस्थी माणसाने त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली. मात्र, त्याबदल्यात पैसे देण्यासाठी या मध्यस्थ व्यक्तीकडून शर्मा यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत होती. संबंधित अधिकाऱ्याला मॅनेज करायचं असल्याने ४ लाख रुपयांच्या रकमेची मागणी दलालाने यांच्याकडे केली होती. दलालाकडून शर्मा यांना ब्लॅकमेलही करण्यात येत होते.

शेतकरी शर्मा यांना ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर दलालानेच हे पैसे हडप केले. दलालाने शर्मा यांच्याकडून ब्लँक चेक सही करून घेतला होता. त्यामुळे कर्जाची रक्कम शर्मा यांच्या अकाऊंटमध्ये जमा होताच, त्याने ती रक्कम काढून घेतली, असेही शर्मा यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी डेहरादून काँग्रेसने भाजपाला जबाबदार धरले असून, भाजपाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यांच म्हटलं आहे.



संबंधित बातम्या