'माह्यावर लक्ष असू द्या'; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीची मतदारांना साद
09 April 18:04

'माह्यावर लक्ष असू द्या'; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीची मतदारांना साद


'माह्यावर लक्ष असू द्या'; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीची मतदारांना साद

कृषिकिंग, यवतमाळ: 'माह्यावर लक्ष असू द्या.' असं म्हणत आज यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघटातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांनी मतदारांना साद घातली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी वैशाली येडे मतांचा जोगवा मागत आहेत.

वैशाली येडे या एका आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील विधवा आहे. पण, परिस्थितीशी दोन हात करत हीच शेतकऱ्याची विधवा बड्या आणि मातब्बर राजकारण्यांच्या विरोधात राजकीय मैदानात उतरलीये. ना पैसा न अडका, ना सोनं ना नाणं, ना बाप राजकारणात किंवा सासरा पुढारी.. तरीही या लोकसभेच्या लढाईत वैशाली येडे जोमानं उतरल्या आहे. त्यांच्या या धाडसाचं चौफेर कौतुक होत आहे.

'माह्यावर लक्ष असू द्या' म्हणत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी वैशाली मतांचा जोगवा मागत आहेत. त्यामुळे आता, वैशालीताईंच्या या हाकेला शेतकरी मतदार कितपत साथ देतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.संबंधित बातम्या