'सिंघम' चित्रपटातील जयकांत शिक्रे करणार राजू शेट्टींचा प्रचार
09 April 14:57

'सिंघम' चित्रपटातील जयकांत शिक्रे करणार राजू शेट्टींचा प्रचार


'सिंघम' चित्रपटातील जयकांत शिक्रे करणार राजू शेट्टींचा प्रचार

कृषिकिंग, पुणे: नेत्यांबरोबरच आता अभिनेते देखील खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. सिंघम चित्रपटांमध्ये जयकांत शिक्रे या खलनायकाची भूमिका साकारणारे प्रकाश राज हे राजू शेट्टी यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १९ किंवा २० तारखेला प्रकाश राज यांची सभा होऊ शकते.

राजू शेट्टी यांनी काढलेली किसान संघर्ष यात्रा तसंच शेट्टी यांच्या वाटचालीमुळे प्रकाश राज प्रभावित झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रचाराला येण्याचं मान्य केलं आहे. २०१४ मध्ये भाजपसोबत असलेले राजू शेट्टी एनडीए सरकारमधून बाहेर पडले. राज्यातही त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे.



संबंधित बातम्या