नैसर्गिक व औषधी वनस्पतींची शेती करून करा लाखोंची कमाई!
14 April 11:00

नैसर्गिक व औषधी वनस्पतींची शेती करून करा लाखोंची कमाई!


नैसर्गिक व औषधी वनस्पतींची शेती करून करा लाखोंची कमाई!

कृषिकिंग, पुणे: नैसर्गिक उत्पादनं आणि औषधं यांची बाजारपेठ खूप मोठी आहे. नैसर्गिक उत्पादनांना नेहमीच मागणी असते. तेव्हा औषधी वनस्पतींची शेती करून खूप फायदा होऊ शकतो. यात उत्पादन खर्च कमी लागतो. पण खूप वर्ष चांगली कमाई होऊ शकते.

औषधी वनस्पतींसाठी मोठ्या शेतांची गरज नाही. जास्त मोठी गुंतवणूकही लागत नाही. तुम्ही काँन्ट्रॅक्टवर औषधी वनस्पतींची शेती करू शकता. हल्ली अनेक कंपन्या काँन्ट्रॅक्टवर औषधांची शेती करतात. ही शेती करण्यासाठी सुरुवातीला काही हजार रुपये खर्च करावे लागतात. पण कमाई होते लाखोंची.

जास्त करून हर्बल प्लान्टमध्ये तुळस, मुळा, एलोविरा इत्यादी वनस्पतींची शेती होते. कमी अवधीत ही रोपटी मोठी होतात. छोट्या छोट्या कुंडीत या वनस्पती लावता येतात. हल्ली देशातल्या औषधांच्या कंपन्या अशा प्रकारची शेती करायला काँन्ट्रॅक्ट देतात. त्यामुळे कमाई निश्चित आहे.

जास्त करून तुळशीच्या शेतीला मागणी आहे. अनेक आयुर्वेदिक कंपन्यांना तुळस लागते. तुळशीसाठी लागवडीयोग्य कालावधी जुलैचा पहिला आठवडा असतो. ही रोपं ४५ X ४५ सेंटीमीटरच्या अंतरावर लावावीत. RRLOC 12 आणि RRLOC 14 या प्रकारच्या रोपांना मात्र ५० X ५० सेंटीमीटरच्या लांबीवर लावली जातात. यानंतर हलके जलसिंचन करावं.

लावणीनंतर लगेच सिंचनाची गरज असते. दर आठवड्याला किंवा जेव्हा गरज वाटेल तेव्हासुद्धा पिकांना पाणी द्यावे.उन्हाळ्यात दर १२ ते १५ दिवसांत पिकांना पाणी द्यायचे असते.

जेव्हा पहिली कापणी होते तेव्हा लगेच पाणी द्यावे. एक लक्षात घ्यावे की कापणीच्या १० दिवस आधी सिंचन थांबवावे. ही कापणी वेळेवर व्हायला हवी कारण याचा परिणाम तेलाच्या प्रमाणावर होतो. जेव्हा पानांचा रंग हिरवा व्हायला सुरुवात होते,तेव्हा ही कापणी करावी. या रोपट्यांवर फुले आल्याने युनीनॉल आणि तेलाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळेच फुले येऊ लागली की रोपट्यांची कापणी सुरू करावी.

जर १० फुट जागा असेल तर जवळपास ३ हजार रुपयांच्या १० किलो बियाणांची गरज असेल. १० हजार रुपयांचे खत आणि २ हजार रुपये इतर खर्च होईल.एका सिझनला जवळपास ८ क्विंटल पिक येते.याची नगदी किंमत ३ लाखांपर्यंत जाते. औषधी वनस्पतींच्या शेतीचं ट्रेनिंगही कंपन्या देतात.टॅग्स