मला एक रुपया कमी द्या, पण बॅट चिन्हालाच मतदान करा; शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल
08 April 18:49

मला एक रुपया कमी द्या, पण बॅट चिन्हालाच मतदान करा; शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

मला एक रुपया कमी द्या, पण बॅट चिन्हालाच मतदान करा; शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

कृषिकिंग, कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याप्रती शेतकऱ्यांमध्ये असलेलं प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका आठवडे बाजारात शेतकरी स्वतःच्या शेतातील टोमॅटो आणि वांगी घेऊन आला असून, मला एक रुपया कमी द्या, पण यावेळी राजू शेट्टींच्या बॅट चिन्हालाच मतदान करा.' असा हा प्रचार करताना हा शेतकरी दिसत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टी यांना यावेळी बॅट हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. प्रचाराची सुरुवात होते ना होते तोपर्यंत त्यांच्या बॅट या चिन्हाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरु झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी दोन वेळा खासदार झाले, त्या शेतकऱ्यांचे शेट्टींप्रती असलेले प्रेम या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.संबंधित बातम्या