नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट; मग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी का नाही- वैशाली येडे
08 April 16:33

नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट; मग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी का नाही- वैशाली येडे


नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट; मग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी का नाही- वैशाली येडे

कृषिकिंग, यवतमाळ: "देशात राजकीय नेत्यांचं निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट येते. मात्र अशी लाट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी का येत नाही," असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाच्या यवतमाळ-वाशीम मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांनी उपस्थित केला आहे.

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशात सहानुभूतीची लाट आली होती. तर राज्यातही केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये त्यांची कन्या प्रितम मुंडे सहानुभूतीच्या लाटेमुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्या होत्या. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायमच वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवं, सर्वसामान्यांना ही लोक प्रतिनिधीत्व करायला मिळावं, अशी टॅगलाईन वैशाली येडे यांच्या प्रचारात देण्यात आली आहे.

वैशाली येडे यांना शेतकरी नेते, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. वैशाली यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली होती. परंतु, दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या आणि गाजलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली यांच्या हस्ते झाले होते.संबंधित बातम्या