शेतकऱ्यांना पेन्शन देणार; १ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर व्याज नाही; भाजपकडून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध
08 April 14:23

शेतकऱ्यांना पेन्शन देणार; १ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर व्याज नाही; भाजपकडून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध


शेतकऱ्यांना पेन्शन देणार; १ लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर व्याज नाही; भाजपकडून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

कृषिकिंग, नवी दिल्ली: आज नवी दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीकडून (भाजप) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. 'संकल्पपत्र' असं नाव भाजपकडून या जाहीरनाम्याला देण्यात आलं आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यातील शेतीसाठीच्या महत्वाच्या घोषणा:
-६० वर्षांवरील वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देणार
-१ लाखापर्यंतच्या कृषीकर्जावर ५ वर्षापर्यंत कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही
-छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रूपये किसान सन्मान निधी देण्याची घोषणा

अन्य महत्वपूर्ण घोषणा:
-राम मंदिराचा पुनरूच्चार करत सनदशीर मार्गाने मंदिर उभारणार
-देशाच्या सुरक्षेशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही
-दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कठोर पावलं उचलणार
-सर्व रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण २०२२ पर्यंत पूर्ण करणार
-सर्व घरांमध्ये वीज, शौचालय उपलब्ध करून देणार
-७५ नवीन मेडिकल कॉलेज व विदयापीठ स्थापन करणार
-व्यवस्थापन व अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा वाढवणार
-छोट्या दुकानदरांना देखील ६० वर्षानंतर पेन्शन दिली जाईल
-राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार
-तीन तलाकविरोधात कायदा करून मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देणार

दरम्यान, संकल्पपत्रातील या सर्व बाबींची पूर्तता २०२२ पर्यंत केली जाणार असल्याचेही भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आले आहे.संबंधित बातम्या