नाशिकच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्र दाहकता; राजकीय नेते मात्र निवडणुकांमध्ये दंग
08 April 12:28

नाशिकच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्र दाहकता; राजकीय नेते मात्र निवडणुकांमध्ये दंग


नाशिकच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्र दाहकता; राजकीय नेते मात्र निवडणुकांमध्ये दंग

कृषिकिंग, नाशिक: अत्यल्प पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव, नांदगाव, चांदवड, सटाणा आणि देवळा तालुक्यासह पूर्व भागात दुष्काळाची तीव्र दाहकता जाणवत आहे. विहिरींची पाणीपातळी पूर्णतः खालावली आहे, जलस्त्रोत (बोअरवेल) आटू लागले आहेत, पाण्याअभावी शेतात पीक नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर या भागात निर्माण झाला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून या भागात अशीच दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी तर डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली होती. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शेती आणि पशूधनाला याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. विकत चारा घेऊन शेतकऱ्यांनी आतापर्यंत पशुधन जगवले. मात्र मार्चनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

सरकारी चारा छावण्या सुरू झाल्या नसल्याने शेतकरी जड अंतकरणाने आपली जनावरं जगवण्यासाठी गोशाळेत दाखल करणं पसंत करतो आहे. मालेगावच्या गोशाळेत सध्या बाराशेहून अधिक जनावरं दाखल झाली आहेत. मात्र, गोशाळा संचालकांनाही जनावरं पोसणं जिकरीचं झालं आहे. समाजातल्या दानशूरांच्या मदतीने पशूधन वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

राजकीय नेते, पुढारी लोकसभा निवडणुकीत गुंतले आहेत. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याकडं आणि जनावरं पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल.



संबंधित बातम्या