शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला सरकारचं जबाबदार- उद्धव ठाकरे
08 April 10:33

शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला सरकारचं जबाबदार- उद्धव ठाकरे


शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला सरकारचं जबाबदार- उद्धव ठाकरे

कृषिकिंग, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमधून शेतकरी प्रश्नांसंदर्भात केंद्रातील भाजप सरकार जोरदार हल्लाबोल केलाय. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

'यावर्षी पावसाने आधीच दगा दिला, तरीही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाढवले. आता अवकाळी पावसाने ते पीकही हातचे गेले, पण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला सरकार जागेवर नाही. सरकारी यंत्रणा देशाच्या शक्तिशाली वगैरे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात आहे व शक्तिशाली शेतकरी साफ कोलमडून पडला आहे. ना सरकार, ना विरोधी पक्ष, ना प्रशासन! शेतकऱ्याने फिर्याद मांडायची कोणाकडे?' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली आहे.

मराठवाडय़ातील बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हय़ांना अवकाळी पाऊस व गारा पडल्याने मोठा फटका बसला. आंबा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांचे नुकसान झाले. विदर्भातही काही ठिकाणी हेच वादळवारे सुटले व शेतातील पिकांचे नुकसान झाले. पंढरपूर व आसपासच्या परिसरात पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला उद्धव ठाकरे यांनी धारेवर धरले आहे.संबंधित बातम्या