जेव्हा हेमा मालिनी शेतात ट्रॅक्टर चालवतात...वाचा काय आहे बातमी
05 April 17:01

जेव्हा हेमा मालिनी शेतात ट्रॅक्टर चालवतात...वाचा काय आहे बातमी


जेव्हा हेमा मालिनी शेतात ट्रॅक्टर चालवतात...वाचा काय आहे बातमी

कृषिकिंग, मथुरा(उत्तरप्रदेश): लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार प्रचाराचे नवनवे फंडे आजमावताहेत. अभिनेत्री आणि भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी गहू कापणीनंतर आता शेतात ट्रॅक्टर चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हेमा मालिनी मथुरा मतदारसंघातून लोकसभेची दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. मथुरेतील गोवर्धन भागात त्या एका शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत असल्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. हेमा मालिनी या गॉगल लावून ट्रॅक्टर चालवत आहेत, असा एक फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोत त्या 'व्हिक्ट्री साइन' दाखवताना दिसत आहेत.

दरम्यान, गेल्या रविवारपासून हेमा मालिनी यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला असून, प्रचाराच्या पहिल्याच दिवशी गव्हाच्या शेतात जाऊन त्यांनी कापणी केली होती. यावेळी शेतात काम करणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. हेमा यांचा प्रचाराचा हा 'हटके' फंडा तेव्हाही चर्चेचा विषय बनला होता.संबंधित बातम्या