निजामाबादच्या शेतकऱ्यांनी ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा; दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्याची मागणी
05 April 16:15

निजामाबादच्या शेतकऱ्यांनी ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा; दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्याची मागणी


निजामाबादच्या शेतकऱ्यांनी ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा; दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्याची मागणी

कृषिकिंग, निजामाबाद: तेलंगणाच्या निजामाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या शेतकऱ्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये. निवडणूक प्रचारासाठी वेळ मिळावा यासाठी मतदानाला एका आठवड्यासाठी स्थगिती द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ८ एप्रिलला या याचिकेवर न्यायालयाकडून सुनावणी होणार आहे.

याशिवाय निजामाबाद मतदारसंघात ११ एप्रिलऐवजी दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान घ्यावे. अशी मागणी या शेतकऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने तेलंगणातील सर्वच सर्व १७ लोकसभा मतदार संघांसाठी ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना केली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळतो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

निजामाबाद लोकसभेच्या जागेसाठी एकूण १८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये हळद आणि ज्वारीला हमीभाव मिळण्यासह, हळद पिकांसाठी हळद मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी १७९ शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता पुन्हा निवडणूक लढवत आहे. तर काँग्रेसकडून मधुयाक्षी गौड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

शेतकऱ्यांच्या दुर्दशेची जाणीव करून देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हे सर्व शेतकरी अपक्ष म्हणून निवणूक लढवत आहे. ज्वारी आणि हळदीला हमीभाव निर्धारित करून, त्यांची एमएसपीने खरेदी करावी. अशी या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. (केंद्र सरकार २३ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ठरवत असते. या २३ पिकांमध्ये ज्वारीचा समावेश नाही.)

तेलंगणामधील बाजार समित्यांमध्ये सध्या नवीन उत्पादित हळद दाखल होत आहे. या हळदीला ६ हजार २०० ते ६ हजार ३०० तर ज्वारीला १ हजार ६५० ते १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नसल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.संबंधित बातम्या