'देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात, कुलकर्णी-देशपांड्यांची नाही'- राजू शेट्टी
05 April 15:15

'देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात, कुलकर्णी-देशपांड्यांची नाही'- राजू शेट्टी

'देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात, कुलकर्णी-देशपांड्यांची नाही'- राजू शेट्टी

कृषिकिंग, कोल्हापूर: 'देशासाठी हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात. कुलकर्णी किंवा देशपांड्यांची नाही. पण ते इतरांना देशभक्ती शिकवत असतात’. असे विधान राजू शेट्टी यांनी केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हातकणंगले येथे आयोजित प्रचारसभेत सभेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

राजू शेट्टींच्या या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाजातून रोष व्यक्त करण्यात आला असून, राजू शेट्टींविरोधात कोल्हापुरमध्ये पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल राजू शेट्टी यांनी जाहीर माफी मागितली आहे. शहिदांना न्याय देण्याच्या हेतूने आपण हे वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
संबंधित बातम्या