उजनी धरणातील पाणीसाठा उणे २५ टक्क्यांवर!
05 April 14:50

उजनी धरणातील पाणीसाठा उणे २५ टक्क्यांवर!


उजनी धरणातील पाणीसाठा उणे २५ टक्क्यांवर!

कृषिकिंग, सोलापूर: उजनी धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने खालावत चालला असून, मागील सहा महिन्यांत या धरणातील पाणीसाठा ११० टक्क्य़ांवरून घटून उणे २५ टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे. ही स्थिती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उद्भवली आहे. याही परिस्थितीत धरणातून कालवा, नदीतून पाणी सोडले जात आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत धरणात जो पाणीसाठा उपलब्ध आहे, तो येत्या जून-जुलैपर्यंत पुरवावा लागणार आहे.

सध्यस्थितीत धरणात ५० टीएमसी पाणी मृतसाठय़ाच्या स्वरूपात शिल्लक आहे. धरणाचा मृतसाठा हा ६३.६५ टीएमसीमध्ये असतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात मृतसाठय़ातील १३.५० टीएमसी पाणीसाठा वापरला गेला आहे. तळाशी मोठय़ा प्रमाणात गाळ असल्याने धरणात खरोखर ५० टीएमसी पाणी शिल्लक आहे काय, याविषयी शंका व्यक्त होत आहे.

वाढते बाष्पीभवन आणि उपसा विचारात घेता उजनी धरणातील पाण्याचा साठा येत्या जूनपर्यंत वजा ५० टक्क्य़ांच्या पुढेच जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.टॅग्स

संबंधित बातम्या