'एल निनो'बाबत अंदाज वर्तविताना खबरदारी घ्या- जागतिक हवामान संस्था
05 April 12:50

'एल निनो'बाबत अंदाज वर्तविताना खबरदारी घ्या- जागतिक हवामान संस्था


'एल निनो'बाबत अंदाज वर्तविताना खबरदारी घ्या- जागतिक हवामान संस्था

कृषिकिंग, पुणे: एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी भारतात मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून कमी पडण्याबाबत अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकन हवामान विभाग, ऑस्ट्रेलियन हवामान संस्था यांनी हा अंदाज यापूर्वी व्यक्त केला होता. आता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही यावर्षी भारतात सरासरीच्या तुलनेत ९३ टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे़. मात्र, असा अंदाज वर्तविताना खबरदारी घ्या, असा इशारा जागतिक हवामान संस्थेने दिला आहे़.

एल निनोबाबत वेगवेगळ्या हवामान संस्थांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या अंदाजांबाबत जागतिक हवामान संस्थेने जाहीर केले आहे की, 'मॉडेल आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या मार्च महिन्यात एल निनो कमकुवत आहे़. जून महिन्यात एल निनो आणखी ५० टक्क्यांपर्यंत कमकुवत होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे या काळात दीर्घकाळाच्या दृष्टीने अनिश्चितता आहे़. त्यामुळे एल निनोच्या प्रभावाबाबत पूर्वानुमान देताना सावधगिरी बाळगली पाहिजे."संबंधित बातम्या