काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का?- नरेंद्र मोदी
05 April 10:33

काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का?- नरेंद्र मोदी


काँग्रेसने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली का?- नरेंद्र मोदी

कृषिकिंग, नवी दिल्ली: "सत्तेत असताना काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्याची हमी दिली होती. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले 'एमएसपी'चे आश्वासन पाळले नाही. त्यासंबंधी कधी एक शब्दही उच्चारला नाही," अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी काँग्रेसवर हे टीकास्त्र सोडलं आहे.

यावेळी नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईक, शेतकऱ्यांना हमीभाव, रोजगार, काश्मिरमधील परिस्थिती, दहशतवाद आणि राममंदिर यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्यावर चर्चा केली. याशिवाय काँग्रेसने २००४ मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर २००९ मध्येही त्यांचेच सरकार आले. मात्र, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले का? असा सवालही नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.संबंधित बातम्या