पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर
04 April 14:35

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर

कृषिकिंग, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘झायेद मेडल’ने गौरवण्यात येणार आहे. यूएईचे राजपुत्र मोहम्मद बिन झायेद यांनी ट्विट करत स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

राजपुत्र झायेद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ भारताबरोबर आमचे ऐतिहासिक आणि व्यापारी संबंध आहेत. हे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी माझे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे यूएईच्या राष्ट्रपतींनी त्यांना झायेद मेडलने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.’
संबंधित बातम्या