शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करण्यासाठी चांदवडकरांची ४० हजारांची मदत
03 April 17:37

शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करण्यासाठी चांदवडकरांची ४० हजारांची मदत


शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करण्यासाठी चांदवडकरांची ४० हजारांची मदत

कृषिकिंग, यवतमाळ: नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार वैशाली येडे यांना ४० हजार ७९५ रुपयांची मदत सुपूर्द केली आहे. शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करण्यासाठी 'एक नोट, एक वोट' मागत वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने आपल्याला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चांदवडच्या शेतकऱ्यांनी ही मदत करत पाठिंबा दर्शवला आहे.

वैशाली येडे यांना शेतकरी नेते, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. राजकीय घराणेशाही, आणि बड्या उमेदवारांची प्रचार रणधुमाळी जोरात सुरु असतानाही, 'नवरा ज्या समस्येसाठी स्वतःला लटकवून घेतो.' ती समस्या सोडवण्यासाठी थेट संसदेत जाऊन भांडायची मानसिकता ठेवणे, हे तितकसं सोपं नाहीये. त्यामुळे यवतमाळमधील मतदारांना शेतकऱ्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करण्याची एक चांगली संधी आहे.

यवतमाळच्या मतदारांनी साथ दिल्यास देशात आत्तापर्यंत झालेल्या साडेतीन लाख शेतक-यांच्या आत्महत्यांकडे ज्या व्यवस्थेनं दुर्लक्ष केलं, त्या व्यवस्थेच्या छाताडावर ''त्या' दुर्गावतार धारण करत पाय देऊन उभ्या राहतील. हे नक्की!

तुम्हीही वैशाली येडे यांना मदत करू शकता,
मदत करण्यासाठी:
अकाउंट नंबर- 2639101006602
कँनरा बँक शाखा यवतमाळ
IFSC CODE - CNRB0002639संबंधित बातम्या