आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना २००९ प्रमाणे सरसकट कर्जमाफी देऊ- सुप्रिया सुळे
03 April 15:17

आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना २००९ प्रमाणे सरसकट कर्जमाफी देऊ- सुप्रिया सुळे


आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना २००९ प्रमाणे सरसकट कर्जमाफी देऊ- सुप्रिया सुळे

कृषिकिंग, पुणे: आमचं युपीएचं सरकार आल्यावर २००९ मध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले आहे. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी, पार्थ पवार आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

या सभेत भाजप, मोदी आणि फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपाने पाच वर्षांत काम न करता नुसती आश्वासने दिली. काहीच काम नसल्यामुळे वैयक्तिक टिका करण्याचा सपाटा लावला आहे. ही आमच्या कुटुंबाची निवडणूक नाही तर ही देशाची, देशातील शेतकर्‍यांची निवडणूक आहे असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.संबंधित बातम्या