दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या ५५ गावातील शेतकरी नाही...करणार मतदान; वाचा काय आहे बातमी?
03 April 15:02

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या ५५ गावातील शेतकरी नाही...करणार मतदान; वाचा काय आहे बातमी?


दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या ५५ गावातील शेतकरी नाही...करणार मतदान; वाचा काय आहे बातमी?

कृषिकिंग, औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांना आपआपल्या परीने खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील ५५ पेक्षा जास्त गावांनी 'नो वॉटर,नो वोट' अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी धसका घेतला आहे.

२३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी. म्हणून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली. मात्र, अजूनही ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदानाचा हक्क बजावणार नाही. निवडणुकीतून आम्ही लोकप्रतिनिधींना विकामकामे करण्यासाठी निवडून देतो. मात्र, निवडून गेल्यानंतर या लोकप्रतिनधींना विकासकामे करण्याचा विसर पडतो. असे या ५५ गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी खासदार रावसाहेब दानवे यांनी ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. याशिवाय पैठण तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते. पंचायत समिती निवडणुका असो की लोकसभा प्रत्येक वेळी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र अजूनही ही योजना पूर्ण झाली नसल्याने ५५ पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी 'नो वॉटर,नो वोट' अशी भूमिका घेतली आहे.संबंधित बातम्या