नेपाळमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ३१ जण मृत्यूमुखी तर ६०० जण जखमी
03 April 11:29

नेपाळमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ३१ जण मृत्यूमुखी तर ६०० जण जखमी


 नेपाळमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ३१ जण मृत्यूमुखी तर ६०० जण जखमी

कृषिकिंग, काठमांडू: नेपाळला वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा तडाखा बसला आहे. या वादळाचा नेपाळच्या दक्षिणी जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून, वादळामुळे आतापर्यंत ३१ जण मृत्यूमुखी पडले आहे तर, ६०० जण जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक लोक बेघर झाले आहेत.

रविवारी (३१ मार्च) संध्याकाळच्या सुमारास दक्षिण नेपाळच्या बारा आणि पारसा जिल्ह्यातील खेड्यांमध्ये हे वादळ धडकले. या वादळासोबत संततधार पावसाने दक्षिण नेपाळला रात्रभर झोडपले. या वादळासह झालेल्या पावसामुळे या भागातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

या वादळात आतापर्यंत २५ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती नेपाळ प्रशासनाने दिली आहे. हा आकडा अधिक मोठाही असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान बचाव कार्य वेगाने सुरू असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतं आहे.टॅग्स

संबंधित बातम्या