विदर्भात चारा टंचाई; वैरणाचे दर कडाडले
03 April 11:14

विदर्भात चारा टंचाई; वैरणाचे दर कडाडले


विदर्भात चारा टंचाई; वैरणाचे दर कडाडले

कृषिकिंग, अकोला: विदर्भात चारा टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी) दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. पशुधनाला लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची गरज भागविण्यासाठी पिंपळ, सुबाभूळ, कडुनिंबाचा चाराही विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.

मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाले असून, त्याचसोबत चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला. या भागात ज्वारी, कापूूस हे मुख्य पीक होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत या पिकाची जागा सोयाबीन पिकाने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक व आवश्यक कडबा कमी झाला. परिणामी, कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका कडबा पेंडीचा दर ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर या कडब्यापासून तयार होणाऱ्या कुट्टीचा दर ८ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला आहे. ही कुट्टी मात्र ओली करू न पशुपालकांना विकली जात आहे.

यावर्षी तुरीच्या कुटाराचे (भूस) दर तीन ते पाच रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहे. हरभऱ्याचे कुटार पाच ते सात रुपये किलोपर्यंत गेले असून, सुबाभूळ, पिंंपळ, कडुनिंबाचा पाला दोन ते चार रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. चाऱ्याचे दर प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांना पशुधन अडचणीचे वाटत असून, वाटेल त्या दरात पशुधन विकण्यात येत आहेत.संबंधित बातम्या