सेंद्रिय शेतीसाठी सरकारने तयार केला 'ई-बाजार'; शेतकरी थेट ग्राहकांसोबत जोडला जाणार
03 April 08:30

सेंद्रिय शेतीसाठी सरकारने तयार केला 'ई-बाजार'; शेतकरी थेट ग्राहकांसोबत जोडला जाणार


सेंद्रिय शेतीसाठी सरकारने तयार केला 'ई-बाजार'; शेतकरी थेट ग्राहकांसोबत जोडला जाणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशातील सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने http://www.jaivikkheti.in/ हे पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर सेंद्रिय शेतीच्या संदर्भातील सर्व माहिती, सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणारे साहित्य आणि उत्पादित माल खरेदी करण्यासाठी खरेदीदारही मिळणार आहे.

सर्वसाधारणपणे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ही तक्रार राहिलीये की, उत्पादित माल विक्री करण्यासाठी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. मात्र, अशा शेतकऱ्यांना या पोर्टलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

याशिवाय या पोर्टलच्या माध्यमातून पारंपरिक शेतीसोबतच सेंद्रिय शेतीसाठीच्या सर्व सरकारी योजनांची माहितीही शेतकऱ्यांना दिली जात आहे. शेतकरी या पोर्टलच्या माध्यमातून योग्य दराने आपला माल विक्री करू शकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. याचप्रमाणे खरेदीदारही इथे नोंदणी करू शकणार आहे. पोर्टलवर यासाठी E-Bazaar नावाने एक ई-कॉमर्स साइटही तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी थेट ग्राहकांसोबत जोडला जाणार आहे.संबंधित बातम्या