शेतकरी कर्ज फेडू शकला नाही, तर तो फौजदारी गुन्हा नसेल- राहुल गांधी
02 April 14:15

शेतकरी कर्ज फेडू शकला नाही, तर तो फौजदारी गुन्हा नसेल- राहुल गांधी


शेतकरी कर्ज फेडू शकला नाही, तर तो फौजदारी गुन्हा नसेल- राहुल गांधी

कृषिकिंग, नवी दिल्ली: 'मोठं-मोठे उद्योगपती बँकांचा पैसा घेऊन, देशातून पळ काढतात. मात्र, प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास तो फौजदारी गुन्हा ठरतो. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं. परंतु, काँग्रेस सत्तेत आल्यास हा नियम रद्द केला जाईल, शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर तो फौजदारी गुन्हा नसेल,' असं ऐतिहासिक आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिलं आहे.

'हम निभाएंगे', या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. त्यावेळी राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहे. आपले पंतप्रधान रोजच खोटं बोलत आहेत. आम्ही मात्र सत्य बोलतोय. जी शक्य होतील अशीच खरी आश्वासनं आम्ही देत आहोत, असं नमूद करत राहुल यांनी 'न्याय' योजना, रोजगार, किसान, शिक्षण आणि आरोग्य अशी पंचसूत्री मांडली.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबमध्ये आम्ही शेतकरी कर्जमाफीचं वचन दिलं होतं. ते आमच्या सरकारने पूर्ण केलं आहे. केंद्रात सत्तेत आल्यास शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट मांडलं जाईल, असंही राहुल यांनी यावेळी सांगितलं आहे. याशिवाय बँकेचं कर्ज फेडू न शकणारा शेतकरी तुरुंगात जाऊ नये, यादृष्टीने नियम बदलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.संबंधित बातम्या