शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसलेत राजू शेट्टी- पाटील
02 April 11:02

शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसलेत राजू शेट्टी- पाटील

शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसलेत राजू शेट्टी- पाटील

कृषिकिंग, कोल्हापूर: राजू शेट्टींना आजही मी विष्णूचा अवतार मानतो, कारण शेट्टींनी शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी आणली. लक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी होती. मात्र, ज्यांचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत. अशा काँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांच्या मांडीला मांडी राजू शेट्टी बसल्याने त्यांना आपला विरोधच असेल. असे प्रतिक्रिया चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे कोल्हापुरातील उमेदवार संजय महाडिक यांनी काल पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विष्णू हा परमेश्वर आहे म्ह्णून काय झालं? तो चुकत असेल ते बोलायला नको का? जे चूक आहे ते चुकीचेच आहे. अशी माझी धारणा आहे. असेही पाटील यावेळी म्हणाले आहे.संबंधित बातम्या