अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्यासंदर्भातील हायकोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो- पाटील
01 April 17:59

अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्यासंदर्भातील हायकोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो- पाटील

अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्यासंदर्भातील हायकोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो- पाटील

कृषिकिंग, सोलापूर: "राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जलसिंचन घोटाळ्यासंदर्भातील केस हायकोर्टात सुरु आहे. या घोटाळ्याबाबत कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय येऊ शकतो," असे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (सोमवार) सोलापुरात केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज भरला. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूलमंत्री पाटील बोलत होते.

"आपला देश घटनेवर चालतो. कायद्याप्रमाणे सर्वांवर कारवाई होईल. भुजबळ दोन वर्षे आत राहिले. अजित पवारांची केस हायकोर्टात चालू आहे. हायकोर्टाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत. कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय येऊ शकतो. त्यामुळे कोणालाही वाचविण्याचा प्रश्न नाही." असेही महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितले़ आहे.संबंधित बातम्या