मुसळधार पावसात भिजत त्यानं आपलं कर्तव्य बजावलं; पाहा काय आहे बातमी
01 April 15:29

मुसळधार पावसात भिजत त्यानं आपलं कर्तव्य बजावलं; पाहा काय आहे बातमी


मुसळधार पावसात भिजत त्यानं आपलं कर्तव्य बजावलं; पाहा काय आहे बातमी

कृषिकिंग, गुवाहाटी: आसामची राजधानी गुवाहाटीला रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढलं. मात्र, शहरातील चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांने भर पावसात भिजत आपलं कर्तव्य पार पाडले. या वाहतूक पोलिसाच्या या कर्तव्यनिष्ठतेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल प्रचंड व्हायरल होतोय. या पोलिसाची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून अनेकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

मिथुन दास असे या पोलिसाचे नाव आहे. गुवाहटी शहरातील बसिस्ता चौकात ते ड्युटीवर होते. यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र, मिथुन दास यांनी चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून पावसात भिजत आपली ड्युटी पार पाडली.

दरम्यान, आसाम पोलिसांनी ट्विटरवर मिथुन दास यांचा व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये लिहिले आहे की 'कामाप्रती असलेली निष्ठा, आपल्या कर्तव्याप्रती मिथुन दास यांच्या असामान्य निष्ठेला सलाम. त्यांनी आम्हाला दाखविले की समर्पणापुढे वादळी पाऊस साधारण गोष्ट आहे.'



टॅग्स

संबंधित बातम्या