महाराष्ट्रातील १८ खासदार शेतकरी, तर ९ जणांचा व्यवसाय समाजसेवा
01 April 12:01

महाराष्ट्रातील १८ खासदार शेतकरी, तर ९ जणांचा व्यवसाय समाजसेवा


महाराष्ट्रातील १८ खासदार शेतकरी, तर ९ जणांचा व्यवसाय समाजसेवा

कृषिकिंग, पुणे: १५ व्या लोकसभेत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या व्यवसायनिहाय वर्गवारीवर नजर टाकल्यास सर्वाधिक १८ शेतकरी खासदार आहेत. तर ९ खासदारांनी आपला व्यवसाय समाजसेवा असल्याचे नमूद केले आहे.

१५ व्या लोकसभेत पश्चिम बंगाल, केरळ आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व इतर राज्यांच्या तुलनेत उच्चविद्याविभुषित होते. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ खासदार सुशिक्षित असून, ४८ पैकी १५ पदवीधर, १० पदव्युत्तर, २ डॉक्टरेट केलेले, तर ११ जण डिप्लोमा होल्डर आहेत. चार डॉक्टर्सही पहिल्यांदाच खासदार झाले.

शेतीविषयक ध्येयधोरणं ठरविण्यात कृषक समाजाचा सहभाग आणि प्रतिनिधित्व असेल तर त्या योजना अधिक प्रभावशाली ठरतील, असे आग्रही मत कृषीतज्ज्ञ स्वामिनाथन यांनी व्यक्त केलेले आहे. मात्र, दोन-चार जणांचा अपवाद वगळता इतरांनी शेतीविषयक चर्चांमध्ये सहभागच घेतला नसल्याचे दिसून येते. शुन्य प्रहरात केवळ काही जणांनी राज्यातील दुष्काळावर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली.संबंधित बातम्या