कर्जमाफीपेक्षा चांगली आहे, 'न्याय' योजना; मोदींना बोललो होतो; राजन यांचा खुलासा
29 March 11:55

कर्जमाफीपेक्षा चांगली आहे, 'न्याय' योजना; मोदींना बोललो होतो; राजन यांचा खुलासा


कर्जमाफीपेक्षा चांगली आहे, 'न्याय' योजना; मोदींना बोललो होतो; राजन यांचा खुलासा

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक मोठा खुलासा केलाय. आरबीआयचे गव्हर्नर असताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एक प्लॅन दिला होता. 'न्याय' असे या योजनेचे नाव होते आणि ती योजना शेतकरी कर्जमाफीपेक्षा चांगली होती. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यापेक्षा त्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये देणे आणि त्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहित करणे चांगला पर्याय होता. अशी माहिती राजन यांनी दिली आहे.

रघुराम राजन यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केलाय. सध्या ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. याशिवाय त्यांनी काँग्रेसला सुद्धा 'न्याय' ही योजना घोषित करण्याचा सल्ला दिला होता.

उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशाच स्वरुपाची योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास गरीबांना दरवर्षी ७२ हजार अर्थात दरमहा ६ हजार रुपये थेट बँक खात्यात देणार, असा दावा राहुल यांनी केला आहे. अशात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे शेतकऱ्यांची मदत करण्याचा चांगला पर्याय आहे. असेही राजन म्हणाले आहे.संबंधित बातम्या