राजू शेट्टींचा विजय हा देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल- योगेंद्र यादव
28 March 18:14

राजू शेट्टींचा विजय हा देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल- योगेंद्र यादव


राजू शेट्टींचा विजय हा देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल- योगेंद्र यादव

कृषिकिंग, कोल्हापूर: "स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाल्यास तो देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल," असे मत ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक आणि स्वराज अभियान संघटनेचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी आज (गुरुवारी) कोल्हापूरात व्यक्त केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आज उमेद्वारी अर्ज भरला. त्यांच्या प्रचारासाठी योगेंद्र यादव कोल्हापूरात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

"राजू शेट्टींनी एनडीए सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. लोकसभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधेयक मांडले. त्यामुळे शेट्टी हे लोकसभेवर निवडून गेले तर तो केवळ त्यांच्या एकट्याचा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय नसेल तर तो देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचा विजय असेल," असेही यादव यांनी यावेळी सांगितले आहे.



संबंधित बातम्या