दुष्काळाच्या तीव्र झळा; मात्र, दोनच जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू
28 March 12:23

दुष्काळाच्या तीव्र झळा; मात्र, दोनच जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू


दुष्काळाच्या तीव्र झळा; मात्र, दोनच जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू

कृषिकिंग, पुणे: दुष्काळी स्थिती आणि आग ओकणारा सूर्य यामुळे राज्यात पाणी चाऱ्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. मात्र, राज्यातील केवळ दोन जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तीन जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने राहत शिबिरांना मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ९५ हजार १४२ पशुधनासाठी चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.

परतीच्या पावसाने पाठ पिरवल्याने नागरिकांबरोबरच पशुधनही दुष्काळाने बाधित झाले आहे. त्यामुळे अहमदनगर व बीड जिल्ह्यात महसूल विभागातर्फे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर पशुसंवर्धन विभागाने उस्मानाबाद ,जालना आणि परभणी या जिल्ह्यांसह नगर आणि बीड जिल्ह्यातही राहत शिबिर घेण्यास मान्यता दिली आहे.

राज्यात सध्या एकूण ३६४ पशु छावण्या सुरू असून, त्यात महसूल विभागाच्या ३५६ चारा चावण्या, पशुसंवर्धन विभागाची ६ राहत शिबिरे आणि स्वयंसेवी संस्थांकडून सुरू करण्यात आलेल्या दोन छावण्यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात सध्या १६४ चारा छावण्या सुरू असून, त्यात ८४ हजार ६९५ पशुधनाची देखभाल केली जात आहे. तर बीड जिल्ह्यातील १९२ चारा छावण्यांमध्ये ८५ हजार ६७६ पशुधन दाखल झाले आहे. या छावण्यांमध्ये लहान पशुधनाची संख्या २९ हजार १९४ असून मोठे पशूधन १ लाख ६५ हजार ८४८ एवढे आहे.

दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असताना, राज्यातील अनेक जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. राज्यात सुमारे ३ कोटी २० लाख ९४ हजार पशूधन आहे. या पशुधनाला ११ लाख मेट्रिकटन हिरव्या वैरणीची तर ४४१ लाख मेट्रिक टन वाळलेल्या वैरणीची आवश्यकता भासते.टॅग्स

संबंधित बातम्या