सुभाष देशमुखांच्या लोकमंगल कारखान्याचा उतारा साडेआठ टक्क्यांच्या आत
27 March 11:09

सुभाष देशमुखांच्या लोकमंगल कारखान्याचा उतारा साडेआठ टक्क्यांच्या आत


सुभाष देशमुखांच्या लोकमंगल कारखान्याचा उतारा साडेआठ टक्क्यांच्या आत

कृषिकिंग, पुणे: राज्यातील तब्बल ३९ कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्क्यांच्या खाली आहे. यातील १५ कारखाने एकट्या सोलापुर जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल कारखान्याचा साखर उतारा साडेआठ टक्के देखील नाही.

त्यामुळे आता उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराच्या (एफआरपी) नियमामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याची हमी असल्याने, एफआरपीचे पैसे देण्यासाठी साखर उतारा कमी असणाऱ्या कारखान्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने दहा टक्के साखर उताऱ्यांसाठी (एक क्विंटल ऊस गाळपातून होणारे साखर उत्पादन) २७५० रुपये प्रतिक्विंटल एफआरपीची शिफासर केली आहे. तर, त्या पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये देण्यात येतील. तर, साडेनऊ टक्क्यांपेक्षा साखर उतारा कमी असणाऱ्या कारखान्यांना त्या प्रमाणात दर कमी दिला जावा असे आयोगाचे म्हणणे होते. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहचू नये यासाठी साड नऊ टक्क्यांखाली कितीही उतारा असला तरी २६१.२५ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे टनाला २६१२ रुपये द्यावे लागतील.

राज्यातील स्थिती पाहता ३९ साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा दहा अथवा त्यापेक्षा खाली आहे. त्यातील १९ कारखान्यांचा साखर उतारा हा साडेनऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, ९ टक्क्यांपेक्षा साखर उतारा कमी असणारे ७ कारखाने आहेत. त्यातील दोन कारखाने हे सहकार मंत्र्यांशी संबंधित आहेत. कोणत्याही कारखान्याला एफआरपीची रक्कम देण्यासाठी साखर उतारा हा मुख्य स्त्रोत असतो.



टॅग्स

संबंधित बातम्या