लोक कांदा-कांदा म्हणत होते, अन उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा रेटला- रोहित पवार
26 March 18:37

लोक कांदा-कांदा म्हणत होते, अन उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा रेटला- रोहित पवार


लोक कांदा-कांदा म्हणत होते, अन उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा रेटला- रोहित पवार

कृषिकिंग, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी शिवसेना-भाजप युतीवर कडाडून टीका केलीये. रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमधून युतीवर निशाणा साधलाय.

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्या सभेत लोक कांदा-कांदा म्हणत कांद्याच्या दराबद्दल विचारत होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा रेटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

जनतेच्या समस्या समजून न घेता, युतीकडून एकपात्री प्रयोग सुरू आहे. या प्रयोगांमुळे युतीची सत्ता येणार नाहीच, पण खोटेपणाचे प्रयोग पाहुन एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार युतीला नक्की मिळेल, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही रोहित पवार यांनी निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील विकासाचे मुद्दे शोधा आणि बक्षीसे जिंका अशी स्पर्धा ठेवायला हवी. असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.संबंधित बातम्या