कोकणासह राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी
26 March 11:52

कोकणासह राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी


कोकणासह राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

कृषिकिंग, पुणे: कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह काल (सोमवारी) ठिकठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोकणासह बेळगाव व सीमाभागात पहिल्याच वळिवाच्या पावसाने घराघरात पाणी शिरले. सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणासह तासगाव, मिरज तालुक्यात रिमझिम पाऊस बरसला. साताऱ्याच्या वाई, महाबळेश्वर परिसातही पावसाने हजेरी लावली आहे.

याशिवाय मराठवाड्याच्या काही भागांमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील नेकनूर आणि मांजरसुंबा परिसरात अवकाळी पाऊस झाला तर सोलापूर जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.टॅग्स

संबंधित बातम्या