हेमा मालिनी ११ कोटींची शेती असलेल्या खासदार; १७८ कोटी संपत्तीच्या मालकीण
19 March 17:25

हेमा मालिनी ११ कोटींची शेती असलेल्या खासदार; १७८ कोटी संपत्तीच्या मालकीण


हेमा मालिनी ११ कोटींची शेती असलेल्या खासदार; १७८ कोटी संपत्तीच्या मालकीण

कृषिकिंग, पुणे: वारसा हक्क जमीन वाटपामुळे देशातील प्रति व्यक्ती शेतीयोग्य जमीन कमी-कमी होत चालली आहे. तर शेती क्षेत्रात कार्यरत असलेला एक गट असाही आहे. ज्यांच्याकडे शेती नाही तर ते फक्त शेतीत मजूर म्हणून काम करतात. हे मजूर वाट्याने शेती करतात. अशा शेतकऱ्यांना हवामान आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शासकीय मदतही मिळत नाही. म्हणजेच हे शेतकरी असतात. मात्र, त्यांना शेतकरी मानले जात नाही. कारण त्यांच्या नावावर शेती नसते. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचाही फायदा मिळत नाही.

अर्थात प्रत्यक्षात शेतीत कार्यरत असूनही शेतकऱ्यांना पै-पै साठी धडपडावे लागते. मात्र, खासदार मंडळींकडे करोडोंची शेती आहे. आज आपण अभिनेत्री आणि पश्चिमी युपीच्या मथुरा येथून लोकसभेच्या खासदार असलेल्या शेतकरी हेमा मालिनी यांच्या शेतीबाबत जाणून घेणार आहोत.

हेमा मालिनी यांच्याकडे असलेली शेती:
हेमा मालिनी यांच्याकडे ११ कोटींची शेती आहे. त्यांची ही ७ एकर जमीन पुणे जिल्ह्यातील आदर्की खुर्द येथे आहे. त्यामुळे त्या व्यवसायाने शेती करत असल्याचे निष्पन्न होते. हेमा मालिनी यांच्याकडे या शेतीशिवाय ३ कोटींची बिगरशेती जमीनही आहे.

हेमा मालिनी या १७८ कोटी संपत्तीच्या मालकीण आहे. त्यांच्या व त्यांच्या पतीच्या नावे १४८ कोटींचे घरं आहे. यामध्ये हेमा मालिनी यांच्या नावावर ६ तर त्यांच्या पतीच्या नावे २ घरं आहे. यातील एका घराची किंमत ही जवळपास ३८ कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे ३८ लाखांच्या गाड्या आहेत. यामध्ये मर्सिडीज बेंज, रेंज रोव्हर, टोयोटा इनोव्हा यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय हेमा मालिनी यांच्याकडे २.४९ कोटी रुपयांची ज्वेलरी (दागिने) आहे.संबंधित बातम्या