कृषी क्षेत्रात क्रांती झाल्याशिवाय ९ ते १० टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर अशक्य- कांत
19 March 18:05

कृषी क्षेत्रात क्रांती झाल्याशिवाय ९ ते १० टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर अशक्य- कांत


कृषी क्षेत्रात क्रांती झाल्याशिवाय ९ ते १० टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर अशक्य- कांत

कृषिकिंग, नवी दिल्ली: "कृषी क्षेत्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय देश ९ ते १० टक्क्यांचा आर्थिक वृद्धी दर गाठू शकत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे." असे मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत यांनी महिन्द्रा समृद्धी कृषी पुरस्कार कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केले आहे.

"कृषी क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि बाजार सुधारणेची आवश्यकता आहे. तसेच कृषी उत्पादन विपणन समिती, जीवनाश्यक उपभोक्ता वस्तु कायदा यांसारखे जुने कायदे रद्द करण्याची गरज आहे." असेही कांत यांनी यावेळी सांगितले आहे.

त्यांनी पुढे बोलताना सांगितले आहे की, "देशातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. भारताला पुढच्या ३० वर्षांमध्ये जीडीपीमध्ये ९ ते १० टक्क्यांची वृद्धी हवी असेल तर कृषी क्षेत्रामध्ये क्रांती आणणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी उत्पादन विक्रीतील मध्यस्थांना हटवणेही आवश्यक आहे."संबंधित बातम्या