तेलंगणातील नाराज शेतकरी निजामाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवणार
19 March 14:26

तेलंगणातील नाराज शेतकरी निजामाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवणार


तेलंगणातील नाराज शेतकरी निजामाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवणार

कृषिकिंग, निजामाबाद: हळद आणि ज्वारीसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निर्धारित न करणे तेलंगणातील सत्तारूढ तेलगू देसम पार्टीला महागात पडू शकते. कारण तेलंगणाच्या निजामाबाद लोकसभा सीटसाठी राज्यातील जवळपास १००० शेतकऱ्यांनी नामांकन पत्र दाखल करण्याची योजना बनवली आहे. यासाठी ४० शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी नामांकन पत्र दाखल केलं आहे.

या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आम्ही राज्य सरकारकडे हळद आणि ज्वारीला हमीभाव देण्याची मागणी केली होती. सध्या मिळत असलेल्या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नव्हता. मागणी पूर्ण न झाल्याने विरोध करण्यासाठी नामांकन पत्र भरण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २५ हजार रुपये इतके नामांकन शुल्क भरावे लागते.

निजामाबाद लोकसभा सीटवरून सध्या मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता खासदार आहे. त्यांना राज्यातील पहिल्या महिला खासदार ठरल्याचा मानही मिळाला आहे.

तेलंगणामधील बाजार समित्यांमध्ये सध्या नवीन उत्पादित हळद दाखल होत आहे. निजामाबाद बाजार समितीत हळदीला ६ हजार ४०० ते ६ हजार ५०० तर ज्वारीला १ हजार ६५० ते १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यामध्ये निजामाबाद येथे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलन करत, हळद आणि ज्वारीला हमीभाव देण्याची मागणी केली होती. या शेतकऱ्यांनी ज्वारीला ३ हजार ५०० रुपये आणि हळदीला १५ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्यावेळी कृषिकिंगने याबाबत वृत्त प्रसारित केले होते. बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा. http://bit.ly/2DBAMShसंबंधित बातम्या