शेतकरी विरोधी कायदे रद्द करा; किसानपुत्रांचे आज दिवसभर उपवास आंदोलन
19 March 10:48

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा; किसानपुत्रांचे आज दिवसभर उपवास आंदोलन


शेतकरी विरोधी कायदे रद्द करा; किसानपुत्रांचे आज दिवसभर उपवास आंदोलन

कृषिकिंग, पुणे: शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत, यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने आज (मंगळवार) दिवसभर राज्यासह देशभरात अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला जबाबदार असलेले कायदे जोपर्यंत रद्द होणार नाही. तोपर्यंत आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. शेतकऱ्यांची होणारी ही वाताहत प्रशासन आणि राजकीय पक्षांपर्यंत पोहचावी. यासाठी आज दिवसभर हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.

शेतकरी आत्महत्यांना सरकारी धोरण जबाबदार आहे. कायदे करून ते धोरण राबवले जाते. सरकार बदलले मात्र धोरणे आहे तशीच आहे. शेतकरी याच कायदयांमध्ये अडकलेला आहे. या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलन गेल्या काही वर्षणापासून सातत्याने करण्यात येत आहे. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी दिली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी या उपवासाचे सांगता समारंभ आयोजित करण्यात येत आहे. जमेल तसा, जमेल तिथे अन्नत्याग करा, आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करत आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अमर हबीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.संबंधित बातम्या