बीजेपीला शेतकऱ्यांच्या मुद्दयांचा विसर पडलाय; निवडणुकीत शेतकऱ्यांचा आक्रोश दिसेल- वीएम सिंह
18 March 18:03

बीजेपीला शेतकऱ्यांच्या मुद्दयांचा विसर पडलाय; निवडणुकीत शेतकऱ्यांचा आक्रोश दिसेल- वीएम सिंह


बीजेपीला शेतकऱ्यांच्या मुद्दयांचा विसर पडलाय; निवडणुकीत शेतकऱ्यांचा आक्रोश दिसेल- वीएम सिंह

कृषिकिंग, नवी दिल्ली: "भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांच्या मुद्दयांचा विसर पडलाय. केंद्र सरकारने लोकसभेत प्रलंबित असलेल्या दोन शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागणार आहे." असे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे संयोजक वीएम सिंह यांनी सांगितले आहे.

आज (सोमवार) नवी दिल्ली येथे ‘मेरा मुद्दा मेरा वोट’ यासंदर्भात आयोजित संवाददाता संमेलनात ते बोलत होते. यावेळी स्वराज इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादवही उपस्थित होते. वीएम सिंह यांनी पुढे बोलताना सांगितले आहे की, "संपूर्ण कर्जमाफीसह, दीडपट हमीभाव हा स्वामिनाथन आयॊगाच्या शिफारशीनुसार निर्धारित करण्यात यावा. ही देशभरातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे."

ते म्हणाले आहे की, "मोदी सरकारने धानासाठी १७५० ते १७७० किमान आधारभूत किंमत निर्धारित केली आहे. बिहारमधील शेतकऱ्यांना १००० रुपये तर उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना १२०० रुपये प्रति क्विंटल दराने धनाची विक्री करावी लागली आहे. त्यामुळे विक्री किंमत आणि हमीभाव यातील फरक पहिल्यास शेतकऱ्यांना गेल्या ५ वर्षात एकाच पिकात मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे.संबंधित बातम्या