शेतकरी सन्मान योजनेपासून ६८ लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता- सिंह
18 March 15:04

शेतकरी सन्मान योजनेपासून ६८ लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता- सिंह


शेतकरी सन्मान योजनेपासून ६८ लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता- सिंह

कृषिकिंग, नवी दिल्ली: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून ६८ लाख शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी ही माहिती दिली आहे. कारण पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि नवी दिल्ली या राज्यांनी तपशील राष्ट्रीय किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर अद्याप अपडेट केलेला नाही.

या तीन राज्यांबरोबरच मध्य प्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि लक्षद्वीपमध्येही निधीचं हस्तांतरण लाभार्थी शेतकऱ्यांना अद्याप करण्यात आलेलं नाही. कारण अपलोड करण्यात आलेली आकडेवारीचा तपास आणि निधी देण्याची मागणी करण्यात आलेली नाही.

पश्चिम बंगाल सरकारला जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १ हजार ३४२ हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला असता, तर राज्यातील ६७.११ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा झाले आहेत. याच पद्धतीने सिक्कीमच्या ५५ हजार ०९० शेतकऱ्यांना ११ कोटी आणि दिल्लीच्या १५ हजार ८८० शेतकऱ्यांना ११ कोटी ३ कोटी रुपयांचा हिस्सा मिळालेला नाही. शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०१८-१९ हे वित्त वर्षं संपण्यापूर्वी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अशी माहिती सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान, ३३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे ४.७१ कोटी शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील फक्त ३.११ कोटी अर्जच पात्र ठरवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास २.७५ कोटी शेतकऱ्यांना निधी देण्यात आला आहे. त्यातच आता २२ लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना निधी हस्तांतरीत करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.संबंधित बातम्या