राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट; १० वर्षांतील निच्चांकी पातळीवर
18 March 12:43

राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट; १० वर्षांतील निच्चांकी पातळीवर


राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट; १० वर्षांतील निच्चांकी पातळीवर

कृषिकिंग, पुणे: दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला आता भीषण पाणीटंचाईला सामोरे जावं लागणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील अनेक धरणांचा पाणीसाठा हा मागील १० वर्षांतील निच्चांकी पातळीवर पोहचला आहे. अशी माहिती केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, "सध्यस्थितीत महाराष्टातील २७ धरणांमधील पाणीसाठा हा एकूण क्षमतेच्या २४ टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या ३८ टक्के पाणीसाठा होता."

केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या माहितीनुसार, "राजस्‍थान, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि केरळमधील धरणांची पाणीपातळी ही मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. असं असलं तरी हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्‍तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तमिलनाडु मधील धरणांचा पाणीसाठा हा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. तर छत्तीसगढ़ आणि आंध्रप्रदेशमधील धरणांचा पाणीसाठा हा मागील वर्षीच्या इतकाच आहे."टॅग्स

संबंधित बातम्या