समृद्धी महामार्गामुळे आर्थिक समृद्धी; मात्र, शेतकरी भावाभावातील नात्यात दुरावा
18 March 12:00

समृद्धी महामार्गामुळे आर्थिक समृद्धी; मात्र, शेतकरी भावाभावातील नात्यात दुरावा


समृद्धी महामार्गामुळे आर्थिक समृद्धी; मात्र, शेतकरी भावाभावातील नात्यात दुरावा

कृषिकिंग, ठाणे/नाशिक: समृद्धी महामार्गामुळे आर्थिक समृद्धी आली. मात्र, भावाभावातील नात्यात दुरावा निर्माण झालाय. समृद्धी महामार्गासंदर्भात दोन शेतकरी भावांमधील तंट्याचे ५२ खटले दाखल आहेत. तर अनेकांनी समृद्धीच्या पैशांवर मौजमजा करून उधळपट्टी करून मोकळे झाले आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास सुरुवातीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आणि सरकारनं त्यांच्या जमिनीचा मोबदला वाढवला. यामध्ये काही ठिकाणी एक एकरला तब्बल २ कोटी ४३ लाख इतका मोबदला दिला गेला, जो राज्यात सर्वाधिक आहे. आता सारं काही शांत असलं तरी पैसे आले आणि शेतकऱ्यांकडून अनेक मार्गांनी ते पटापट खर्चही झाले. दुसरीकडे पैसे प्राप्त झालेल्या अनेक कुटुंबात भांडणं आणि कोर्टकचेऱ्या सुरु झाल्यात. त्यामुळे समृद्धी महामार्गाची ही दुसरी विदारक बाजू समोर आली आहे.

शहापूर, कल्याण, भिवंडी या भागात लोकांनी जमिनी दिल्या आणि लोक रातोरात लक्षाधीस आणि करोडपती झाले. त्यानंतर अनेक गावात-वाड्या वस्त्यांवर समृद्धीच्या सुरस कथा रंगू लागल्या आहेत. मोठी रक्कम आल्यानं काहींनी मौजमजा केली. अनेकांनी चारचाकी खरेदीला पसंती दिली. काहींनी घराचं बांधकाम काढलं. काहींनी व्यवसाय सुरु केला तर काही चक्क पुढारी होत पोस्टरवर झळकू लागले. त्यातही सर्वात वेदनादायी बाब म्हणजे पैसे आले मात्र नाती दुरावली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या