नेते निवडणुकांमध्ये मश्गुल; शेतकरी प्रश्न दुर्लक्षित
18 March 11:23

नेते निवडणुकांमध्ये मश्गुल; शेतकरी प्रश्न दुर्लक्षित


नेते निवडणुकांमध्ये मश्गुल; शेतकरी प्रश्न दुर्लक्षित

कृषिकिंग, नाशिक: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलीये. सर्वत्र राजकीय वारे जोमानं वाहू लागले आहेत. पण निवडणुकीच्या या धामधुमीत राज्यातला दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्व हरवून गेले आहे. तर गत निवडणुकांप्रसंगी दिलेल्या आश्वासनांचा लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे. आणि आताची आगामी निवडणूकही शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून दूर तर जातीये, असंच काहीसं चित्र राज्यभर पाहायला मिळतंय.

गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्च मिळेल, इतकाही भाव मिळत नाहीये. सरकारकडून प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं. मात्र, ते पुरेसं नसल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. याशिवाय राज्यभर दुष्काळाचं सावट आहे. मात्र, दुष्काळी उपाययोजना या अजूनतरी कागदावरच असल्याचे पाहायला मिळत आहे. चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे सर्वपक्षीय नेते निवडणुकांमध्ये मश्गुल झाल्याचे राज्यभर पाहायला मिळतंय. तर निवडणुका मात्र शेतकरी प्रश्नांपासून दूर जात असल्याचे पाहायला मिळतंय.संबंधित बातम्या