शेतकऱ्यांच्या १८ मागण्या घोषणापत्रात समाविष्ट कराव्यात; शेतकरी संघटनेची मागणी
15 March 11:50

शेतकऱ्यांच्या १८ मागण्या घोषणापत्रात समाविष्ट कराव्यात; शेतकरी संघटनेची मागणी


शेतकऱ्यांच्या १८ मागण्या घोषणापत्रात समाविष्ट कराव्यात; शेतकरी संघटनेची मागणी

कृषिकिंग, नवी दिल्ली: "शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावासह शेतकऱ्यांचे उत्पन्न सुनिश्चित करणे या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या राजकीय पक्षांनी आपल्या घोषणापत्रात समाविष्ट कराव्यात." अशी मागणी शेतकरी आंदोलनाच्या अखिल भारतीय समन्वय समितीने सर्व राजकीय पक्षांकडे केली आहे.

भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टीकेत यांनी आवाहन केले आहे की, "राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा समावेश आपल्या घोषणापत्रात करावा. याशिवाय त्या निर्धारित वेळेत लागू कराव्यात."

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ते म्हणाले आहे की, "शेतमालाचा हमीभाव हा सी २ सूत्राच्या आधारे निर्धारित करण्यात यावा, फळे आणि भाजीपाल्याचे भाव उत्पादन खर्चाच्या दीडपट अधिक दराने घोषित करावे, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीक विमा योजनेचा लाभ कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांना मिळावा." या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.

याशिवाय ६० वर्षांवरील सर्व शेतकऱ्यांना मासिक ५ हजार पेन्शन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी लवकरात लवकर मिळावी. शेतीला रोजगार हमी योजनेशी जोडावे. या आणि अन्य मागण्यांचाही यात समावेश आहे.टॅग्स

संबंधित बातम्या