२.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा- शेखावत
15 March 11:25

२.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा- शेखावत

२.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा- शेखावत

कृषिकिंग, नवी दिल्ली: "पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत २३ टक्के अर्थात २.७५ कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे." अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाई गरबडीत सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा देशभरातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचा केंद्र सरकारने केला आहे. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने या योजनेसाठीच्या पात्र शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याची योजना बनवली आहे. मात्र, योजनेची अंमलबजावणी पाहता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत (३१ मार्च) या १२ कोटी शेतकऱ्यांपैकी निम्म्या अर्थात ६ कोटी शेतकऱ्यांनाही योजनेचा पहिला हप्ता मिळेल की नाही? यात साशंकताच आहे.संबंधित बातम्या