इंग्लंड सोडून तो भारतात करतोय सेंद्रिय शेती!
17 March 11:00

इंग्लंड सोडून तो भारतात करतोय सेंद्रिय शेती!


इंग्लंड सोडून तो भारतात करतोय सेंद्रिय शेती!

कृषिकिंग, पुदुच्चेरी: देशातील प्रत्येक नागरिकाला बळीराजा विषयी आपुलकी आहे. मात्र, आता 'बळीराजाचं राज्य येऊ दे....' हे शेतकऱ्यांचं महत्त्व स्पष्ट करणारं घोषवाक्य साता समुद्रापार पोहोचलंय. शेतीचं हेच महत्त्व ओळखून २६ वर्षांपूर्वी मुळचे युकेचे (इंग्लड) असलेले कृष्णा मॅककेंझी भारतात आले. आणि त्यांनी इथे सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. इंग्लडमधून येऊन तो पुदुच्चेरितील ऑरुविल्ले येथे ते सेंद्रिय शेती करत आहे. सोशल मीडियावर त्यांची ही सेंद्रीय शेती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना कृष्णा मॅककेंझी यांनी याविषयीची माहिती दिली. इंग्लंडमध्ये अनेकदा आपण खातो त्या सर्व अन्नपदार्थांची निर्मिती मुळात कशी होते हे सुद्धा ठाऊक नसतं. ही वस्तुस्थिती त्यांनी बोलून दाखवली.

'निसर्ग हा सर्वगुणसंपन्न असून, त्यात आणखी बदल घडवून आणण्याची काहीच गरज नाही', या एका तत्वावर कृष्णाने सेंद्रीय शेतीची सुरुवात केली. शेतीच्या विविध बाबी लक्षात घेत त्याने या क्षेत्रात प्रगतीपथावर वाटचाल सुरू केली. आजच्या घडीला त्यांनी जवळपास १४० विविध जातीची फळझाडं, फुलझाडं, तेलबिया, धान्याचं उत्पादन घेतलं. सिताफळापासून ते आंबा, पपई, पेरु, गाजर, कारलं, भोपळा, हळद अशी विविध पिकं घेण्य़ास त्यांनी सुरुवात केली.

कृष्णा यांच्या शेतात उगवणाऱ्या या प्रत्येक पदार्थाची चव त्यांच्या कॅफेमध्ये चाखता येते. पर्यटकांसाठी त्यांचा कॅफे हा प्रमुख आकर्षणाचा विषय ठरतो. या कॅफेमध्ये त्यांच्या शेतात उगवलेली प्रत्येक गोष्ट ही थेट तुमची भूक भागवण्यासाठी थेट तुमच्या पुढ्यात असणाऱ्या ताटात वाढली जाते. परदेशी बळीराजाची ही देशी शेती खऱ्या अर्थाने वाखण्याजोगी आहे.संबंधित बातम्या