भाजीपाला उत्पादनाला दुष्काळाची झळ; आवक घटली
14 March 12:53

भाजीपाला उत्पादनाला दुष्काळाची झळ; आवक घटली


भाजीपाला उत्पादनाला दुष्काळाची झळ; आवक घटली

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील भीषण दुष्काळामुळे भाजीपाला उत्पादनाला फटका बसण्यास सुरुवात झालीये. गेल्या दोन आठवड्यांत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. किरकोळ बाजारातही भाज्यांच्या दरात मोठी वाढ झालीये. यावर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट असल्याने एप्रिलपर्यंत भाज्यांची दरवाढ ही अशीच सुरु राहणार असल्याचे बाजार सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिकसह कर्नाटकमधूनही भाजीपाला येतो. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात दरवर्षी ५०० ते ६०० गाड्यांची आवक असते. मात्र, यावर्षी स्थानिक बाजारात भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्यांचे प्रमाण घटले आहे. परराज्यातून भाज्यांचा पुरवठा सुरू असल्याने भाज्यांचे दरवाढीवर जास्त परिणाम झाला नसल्याचे बोललं जात आहे.

मात्र, राज्यातील भाजीपाला उत्पादन कमी झाल्यामुळे आवक घटली आहे. शेतकऱ्यांना जनावरांच्या चारा आणि पाण्याची तरतूदच मोठ्या जिकरीने करावी लागत असताना भाजीपाला उत्पादन कुठून करणार? अशा परिस्थितीही काही शेतकरी उदरनिर्वाहासाठी मिळेल, त्या स्थितीत पाणी विकत घेऊन भाजीपाला उत्पादन करत आहे.संबंधित बातम्या