अटल अर्थसाहाय्य योजना ‘अभिनव’ला ब्रेक; आचारसंहितेमुळे निधी परत जाणार
14 March 11:37

अटल अर्थसाहाय्य योजना ‘अभिनव’ला ब्रेक; आचारसंहितेमुळे निधी परत जाणार


अटल अर्थसाहाय्य योजना ‘अभिनव’ला ब्रेक; आचारसंहितेमुळे निधी परत जाणार

कृषिकिंग, पुणे: शेतमालाचे मूल्यवर्धन करून शेतकरी ते ग्राहक अशी थेट साखळी जुळविणे, जागतिक बाजारपेठेत कृषी व पूरक उद्योग सुरू करणे यासाठी राज्यात अटल अर्थसाहाय्य योजना ‘अभिनव’ सुरु आहे. मात्र, निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे अभिनवला आता ‘ब्रेक’ लागला आहे. यो योजनेसाठी वित्त विभागाकडून सहकार विभागाला देण्यात आलेला ४९० कोटींचा निधी मार्चअखेर खर्च होत नसल्याने, तो निधी आता पुन्हा वित्त विभागाला परत जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व आर्थिक वर्षाचा मार्च महिना एकाच वेळी आल्याने खर्च न होणारा निधी शासन तिजोरीत परत जाणार आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाने २ जानेवारी रोजी अध्यादेश काढून सहकाराला पाठबळ देण्यासाठी अटल अर्थसाहाय्य योजना सुरू केली. या योजनेत राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना सहकारी संस्थांमार्फत कृषिक्षेत्राशी व स्थानिक गरजेशी संबंधित सेवा व्यवसाय व उद्योग उभे करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला स्वच्छता यंत्र, गोदाम, दुय्यम प्रक्रिया युनिट, मोबाइल रिटेल वेअर शॉप, जलशुद्धीकरण यंत्र, कृषिमाल पॅकेजिंग, कापडी पिशव्या निर्मितीसाठी ४० लाखांचा निधी सहकार विभागाकडून देण्यात येतो. जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहायक निबंधक यांच्या दोन समित्यांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर राज्य समितीचे अध्यक्ष असलेले सहकारमंत्री या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देतात. सहकार विभागाकडे अल्प प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातच आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे योजनेसाठीच्या निधीतील बराचसा निधी हा खर्चच झाला नाही.संबंधित बातम्या