पतंजलीकडून 'रुचि सोया'साठी ४ हजार ३५० कोटींची बोली
14 March 11:14

पतंजलीकडून 'रुचि सोया'साठी ४ हजार ३५० कोटींची बोली


पतंजलीकडून 'रुचि सोया'साठी ४ हजार ३५० कोटींची बोली

कृषिकिंग, नवी दिल्ली: योगगरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने दिवाळखोरीत निघालेल्या 'रुचि सोया'साठी ४ हजार ३५० कोटींची बोली लावली आहे. पतंजलीने या बोलीमध्ये मागील ४ हजार १५० कोटींच्या बोलीमध्ये २०० कोटींनी वाढ केली आहे. ही रक्कम कंपनीला पतंजलीकडून रोख स्वरूपात दिली जाणार आहे.

यासंदर्भातील माहिती पतंजलीचे प्रवक्ता एस.के.तिजारावाला यांनी प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. हा निर्णय कंपनीने शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने घेतला आहे. असेही त्यांनी या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात रुचि सोयासाठी अदानी विल्मरने ४ हजार ३०० कोटींचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, व्यवहार प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाचे कारण पुढे करत जानेवारी महिन्यात तो प्रस्ताव मागे घेण्यात आला. पतंजलीने यापूर्वी ४ हजार १०० कोटींची बोली लावली होती. त्यात आता पतंजलीकडून २०० कोटींची वाढ करण्यात आली आहे.

रुचि सोया ही भारतीय खाद्यतेल उद्योगातील आघाडीची कंपनी आहे. मागील ४ वर्षांपासून विक्री मंदावल्याने रुचि सोयावरील कर्ज सध्या १२ हजार कोटींवर पोहचले आहे. कर्जात बुडालेल्या रुचि सोया फर्मचे देशभरात अनेक मैन्युफैक्चरिंग प्लांट असून, न्यूट्रेला, महाकोश, सनरिच, रूचि स्टार आणि रूचि गोल्ड हे प्रमुख ब्रँड आहेत.संबंधित बातम्या