१६ आणि १७ मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
14 March 10:38

१६ आणि १७ मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता


१६ आणि १७ मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके तीव्र होत आहेत. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानामध्ये मोठी वाढ झालीये. मध्य महाराष्ट्रातही तापमान अधिक असल्याने हवेत उकाडा जाणवत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मराठवाडा, विदर्भात मात्र राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले जात आहे. या ठिकाणी बहुतांश भागातील कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचले आहे. परभणी व नांदेडमध्ये ३९ अंशांपुढे कमाल तापमान आहे. विदर्भात अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशांपुढे गेले आहे. सरासरीपेक्षा हे तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे.

दरम्यान, १६ आणि १७ मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.संबंधित बातम्या