शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करा; अजिंक्य रहाणेचं व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन
12 March 18:43

शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करा; अजिंक्य रहाणेचं व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन

शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करा; अजिंक्य रहाणेचं व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन

कृषिकिंग, पुणे: शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आदर करण्याबाबत, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओतून त्याच्यातला सामाजिक जाण असलेला व्यक्ती पाहायला मिळतोय.

या व्हिडीओत अजिंक्यनं सर्वांना एक आवाहन केलं आहे. तो म्हणाला,'' एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत. ''

क्रिकेटमधील खरा जंटलमन असलेला हा फलंदाज मैदानाबाहेरही माणूसकी जपणारा व्यक्ती आहे. हे याच व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतंय.टॅग्स

संबंधित बातम्या